माईसाहेब डॉ. सविता भीमराव आंबेडकर (२०२५)
दिग्दर्शन प्रकाश त्रिभुवन
निर्मिती प्रकाश त्रिभुवन अवलोकितेश्वर प्रॉडक्शन
प्रमुख कलाकार शैलेश दातार , पल्लवी पालकर, शंतनू मोघे, माधव अभ्यंकर, कमलेश सावंत,अनिल नगरकर, डॉ. विजय्कुमार देशमुख,शाहिरा सीमा पाटील, प्रकाश त्रिभुवन
गीते प्रकाश त्रिभुवन
संगीत जॉली मोरे, राहुल तायडे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २५ डिसेंबर २०२५


माईसाहेब डॉ. सविता भीमराव आंबेडकर हा प्रकाश त्रिभुवन लिखित व दिग्दर्शित २०२५ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी ऐतिहासिक चरित्रपट आहे. हा चित्रपट डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या पत्नी डॉ. सविता आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाची निर्मिती अवलोकितेश्वर प्रॉडक्शनने केली आहे.[] चित्रपटामध्ये डॉ. सविता आंबेडकर यांच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट होण्यापूर्वीचे जीवन, बाबासाहेबांसोबतचे सहजीवन आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरचा काळ यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. डॉ. सविता आंबेडकर यांच्या भूमिकेबाबत असलेल्या विविध मतप्रवाहांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या जीवनातील काही घटनांकडे चित्रपटातून पाहिले जाते.

कथानक

संपादन

चित्रपटाचे कथानक डॉ. सविता आंबेडकर यांच्या जीवनाभोवती केंद्रित आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी त्यांची भेट होण्यापूर्वीचा काळ, त्यानंतरचे वैवाहिक जीवन आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरचा काळ या जीवनप्रवासाचे चित्रण चित्रपटात करण्यात आले आहे.

विशेषतः ५ डिसेंबर १९५६ रोजी, म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाच्या आदल्या रात्री घडलेल्या घटनांचा संदर्भ चित्रपटाच्या कथानकात महत्त्वाचा आहे. त्या रात्री नेमके काय घडले असावे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे.

चित्रपटाचा केंद्रबिंदू डॉ. सविता आंबेडकर असला तरी त्यामध्ये बुद्ध तत्त्वज्ञान तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भही मांडण्यात आला आहे.

कलाकार

संपादन

संदर्भ

संपादन
  1. "Maisaheb Dr. Savita Bhimrao Ambedkar".